सोमवार, १८ जुलै, २०११

नकारात्मक विचार हे यशाच्या वाटचालीतले मोठे अडथळे आहेत. अपयश अनेकांना येतं, नाही ते यावंच! कारण अपयश आलं की मनुष्य त्या पाठीमागची कारणं शोधू लागतो. आणि पुन्हा प्रयत्न करून यश मिळवण्याचा निर्धार करतो.
त्यासाठी त्याने सदैव आशावादी राहिलं पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोण हा त्याला जुनं अपयश विसरून, अनेक अडचणीँवर विजय मिळवून, नव्या जोमाने यशाकडे वाटचाल करण्यासाठी ऊर्जा देतो.
मनुष्य कितीही हुशार, कष्टाळू, सर्व साधनांनी युक्त असला तरीही जर त्याच्याकडे आत्मविश्वास आणि आशावादी विचारसरणी नसेल तर तो अपेक्षित यशापर्यँत पोचेलच असे नाही.
तेव्हा कधीही निराश होऊ नये. कारण कुठेतरी आशेचा एखादा किरण असतोच असतो.
''BE POSITIVE''