बुधवार, ११ एप्रिल, २०१२

"कॉलेज जीवन...!!!"

  आठवतो भीत-भीत कॉलेजमधे घेतलेला तो प्रवेश... 
अन् आठवतो खिडकीमागच्या पुजाय्राचा तो आवेश...
 एकदातरी त्याची जिरवावीशी वाटते, 
कॉलेज जीवनातील रम्य आठवणीत हरवावेसे वाटते... 

 आठवते धावत पळत गाठलेले 'पवि'चे ते लेक्चर... 
अन् हृदयी साठवलेले ते अष्टाङ्गहृदयाचे पिक्चर... 
पुन्हा एकदा तो 'इतिहास' जगावासा वाटतो, 
कॉलेज जीवनातील रम्य आठवणीत हरवावेसे वाटते...  

आठवतो तिसय्रा मजल्यावरचा तो डिसेक्शन-कम-डिस्कशन हॉल... 
अन् आठवतात Greys वाचून राम गिरामचे झालेले हाल...
 देहदानावरची ती कविता पुन्हा डोळे भरून पहावीशी वाटते, 
कॉलेज जीवनातील रम्य आठवणीत हरवावेसे वाटते...  

आठवतो Physio departmentचा तो terror... 
अन् आठवतात Hb estimation मधले ते error...
 पुन्हा सगळे मिळून वर्गात प्राणायाम करावासा वाटतो, 
कॉलेज जीवनातील रम्य आठवणीत हरवावेसे वाटते...  

आठवतात PL मधल्या जागवलेल्या त्या रात्री...
 कशीबशी जमवलेली पुस्तकांशी ती मैत्री... 
तो थरार मात्र पुन्हा अनुभवावासा वाटत नाही, 
पण,
 कॉलेज जीवनातील रम्य आठवणीत हरवावेसे वाटते....