कधी कधी एकटंच स्वतःत रमताना, स्थळकाळाचे भान न राहता शून्यात नजर लावून पाहताना, शांत-सुंदर वेळी कुणीतरी आपली एकाग्रता भंग करत विचारतं, ''काय रे?'' तेव्हा आपलं उत्तर हेच असत नाही काय? काही नाही सहज...
शनिवार, १ सप्टेंबर, २०१२
*महावीर*
मनाला खूप भावलेल्या या काही ओळी...
.
तो महावीर कित्येकात आहे
प्रत्येकात आहे
खोल-आत-उपजत
भावित
पूजित
परिचित
पण बहुतेकातला महावीर आहे मूर्च्छित! त्याला जाग यावी
पण जाग यायला
लागते आग-वेड-संकल्प उरात खोल रूतावा लागतो
एक बाण
एक तीर
तेव्हा
युगायुगातून जन्मतो
एखादा 'महावीर'
जो कधी मरत नाही
दृष्टी पुढून सरत नाही काळापुढे ढळत नाही
प्रतिमा त्याची मिटत नाही...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)